
Sunandan Lele on IND vs ENG T20 WC : भारत - इंग्लंड सामन्यावर पावसाचं संकट?
Continues below advertisement
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) स्पर्धांची जेतेपदे गेल्या कित्येक वर्षांत भारताला दुरापास्त झाली आहेत. आज, गुरुवारी टी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत गतविजेत्या इंग्लंडचा सामना करताना जेतेपदांचा हा दुष्काळ संपविण्याचे ध्येय टीम इंडियापुढे आहे.
२०२२च्या टी-२० वर्ल्ड कप उपांत्य फेरीत मात्र इंग्लंडने भारतावर पूर्ण वर्चस्व राखत दहा विकेटने विजय साजरा केला होता. अखेरच्या षटकांतच धावांचा वेग वाढविण्याचे धोरण भारताने कधीच सोडले आहे. सध्याच्या घडीला रोहित आणि कंपनी प्राधान्य देते ती आक्रमक फलंदाजीला. यंदाच्या स्पर्धेतील वाटचाल बघता भारत प्रोव्हिडन्स स्टेडियमवरील या उपांत्य सामन्याद्वारे मागचे सगळे हिशेब चुकते करेल, असा अंदाज आहे.
Continues below advertisement