Sujay Vikhe Vs Nilesh Lanke :अहमदनगरमध्ये विखेंविरुद्ध लंके ? कोण होणार अहमदनगरचा किल्लेदार?
Sujay Vikhe Vs Nilesh Lanke :अहमदनगरमध्ये विखेंविरुद्ध लंके ? कोण होणार अहमदनगरचा किल्लेदार?
आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा या कधीही जाहीर होतील. पण अशातच एका मतदार संघाचीसुद्धा चांगलीच चर्चा आहे. खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध आमदार निलेश लंकेे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये दोन्ही गटाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतंय. विशेष म्हणजे या दोन्ही कार्यक्रमात निलेश लंकेंच्या पत्नी देखील सक्रिय होताना दिसत आहेत. तसंच खा.सुजय विखे यांची पत्नी धनश्री विखेही प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन महिला वर्गाला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे आ. निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी देखील शिवस्वराज यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा क्षेत्र पिंजून काढत आहेत.