Sujay Vikhe : सुजय विखेंची ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणीची मागणी

Continues below advertisement

Sujay Vikhe : सुजय विखेंची ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणीची मागणी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणीबाबत निलेश लंके यांची प्रतिक्रिया... सुजय विखे यांना पराभव मान्य नाही, त्यांनी पराभव स्विकारावा... सुजय विखेंनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणीची मागणी केल्यानंतर निलेश लंके यांची प्रतिक्रिया... विखे कुटुंबाचा इतिहास असाच असल्याचा केला लंके यांनी उल्लेख... यशवंतराव गडाख यांच्याबाबतही विखे कुटुंबियांकडून असंच करण्यात आल्याचे लंके म्हणाले... ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत शंका उपस्थित करत एक प्रकारे केंद्रीय यंत्रांवरच विखेंनी आक्षेप घेतला... अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील (Ahmednagar Lok Sabha Constituency) भाजपचे (BJP) पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Dr Sujay Vikhe Patil) यांनी 40 केंद्रांवरील ईव्हीएम (EVM) आणि व्हीव्हीपॅटची (VVPAT) पडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी 47 हजार 200 रुपये याप्रमाणे एकूण 18 लाख 88 हजार रुपयांचे शुल्कदेखील भरले आहे. यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10, पारनेर 10, नगर 5, शेवगाव-पाथर्डी 5, कर्जत- जामखेड 5, राहुरी येथील 5 अशा 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे.  लोकसभा निवडणुकीत डॉ.  सुजय विखे पाटील यांचा 28 हजार 929 मतांनी पराभव झाला. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली. दरम्यान सुजय विखेंनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. निवडणुकीच्या निकालानंतर सात दिवसांत उमेदवाराने पडताळणी संदर्भात मागणी करायची असल्याने डॉ. सुजय विखे पाटील यांनी 10 जून रोजीच निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. मात्र याबाबत सुजय विखेंच्या कार्यालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. दरम्यान निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी याबाबत दुजोरा दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram