VBA vs RSS: 'संघाला कायदा-संविधान मानायला लावू', सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात मोर्चा; पोलीस परवानगी नाही
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीने (VBA) सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात (RSS) मोर्चा काढला आहे. 'संघाला हरविण्याची ताकद केवळ आंबेडकरी जनतेमध्ये आहे आणि संघाला झुकवून कायदा आणि संविधान मानायला लावू,' असा थेट इशारा सुजात आंबेडकर यांनी दिला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही हा मोर्चा काढण्यात आला. संघावर बंदी घालण्याची प्रमुख मागणी या मोर्चाद्वारे केली जात आहे. सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे की, ते RSS कार्यालयाला भेट म्हणून भारताचा तिरंगा, संविधानाची प्रत आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट कायद्याची प्रत देणार आहेत, ज्यानुसार संघाने नोंदणी करावी अशी त्यांची मागणी आहे. प्रकाश आंबेडकर या मोर्चात सहभागी झालेले नाहीत. मोर्चा अडवून कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement