Solapur | सोलापुरात महिला पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या; अधिकाऱ्याने मानसिक त्रास दिल्याचा आरोप
Continues below advertisement
सोलापूरात एका पोलीस कर्मचारी महिलेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. सोलापूर शहराजवळील एका गावानजीक महिलेने विष प्राशन केलं होतं. त्यानंतर महिलेच्या नातेवाईकाने बेशुद्धावस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्हॉट्सअॅप चॅटद्वारे मानसिक त्रास दिला. त्यामुळे पत्नीनं आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप मृत महिलेच्या पतीने केलाय. मात्र या घटनेबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये. या घटनेचा सविस्तर तपास केला जाईल. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया सोलापूरच्या पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिलीये.
Continues below advertisement