Suhas Kande :Uddhav Thackeray यांची नार्कोटेस्ट करा,म्हणजे कुठल्या कंपनीकडून किती पैसे घेतले समजेल
उद्धव ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा म्हणजे कुठल्या कंपनीकडून किती पैसे घेतले हे कळेल, असा घणाघाती आरोप शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी नाही, तर श्रीधर पाटणकर यांची चौकशी होऊ नये म्हणून राजीनामा दिला, असा खळबळजनक दावा देखील कांदे यांनी केला आहे. हे सगळं सत्य बाहेर यावं म्हणूनच उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करणं गरजेचं आहे, असं कांदे म्हणाले..