Gopichand Padalkar : 'राजारामबापू कारखाना सुरू होऊ देणार नाही', Jayant Patil यांना थेट इशारा

Continues below advertisement
भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात जतमधील राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या (Rajarambapu Patil sugar factory) मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. 'जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या जत मधल्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा दुराडा यंदा पेटू देणार नाही', असा सज्जड इशारा पडळकर यांनी दिला आहे. हा साखर कारखाना सभासदांचा असून तो त्यांना परत मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष उभारणार असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे. प्रसंगी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कारखाना ढापला असून तो सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे, अशी भूमिका घेत पडळकर यांनी जयंत पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola