साखर आयुक्तालयाची कारखान्यांवर कारवाई, FRP न दिल्याने 46 कारखान्यांचे गाळप परवाने रोखले
शेतकऱ्यांना गेल्या गाळप हंगामातील रास्त व किफायतशीर दरानुसार (एफआरपी) अद्यापही पूर्ण रकमा न दिल्याने राज्यातील 64 साखर कारखान्यांना यंदाचा गाळप परवाने मंजूर करण्यात आलेले नाहीत. साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिलीय. गाळप परवाना देण्यात आलेल्या कारखान्यांपैकी 25 ऑक्टोबरअखेर 27 काराखान्यांनी धुराडी पेटवली होती. त्यात 14 सहकारी , तर खासगी मालकीच्या 13 कारखान्यांचा समावेश आहे.