Sudhir Mungantiwar On Sanjay Shirsat : मुख्यमंत्रीपदावर कधीच चर्चा झाली नाही : सुधीर मुनगंटीवार

Continues below advertisement

Sudhir Mungantiwar On Sanjay Shirsat : मुख्यमंत्रीपदावर कधीच चर्चा झाली नाही : सुधीर मुनगंटीवार 
शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. २०१९ साली भाजप आणि शिवसेनेमध्ये अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता असं मोठं विधान शिरसाट यांनी केलंय. भाजपचे १०५ आमदार असल्यानं त्यांना मुख्यमंत्रिपद पहिले अडीच वर्षं मिळणार होतं असं शिरसाट म्हणाले. मात्र शरद पवारांनी पाच वर्षं मुख्यमंत्रिपद तुम्हीच घ्या अशी ऑफर दिली आणि उद्धव ठाकरेंची नियत फिरली असा आरोप शिरसाट यांनी केलाय. पवारांची ऑफर आल्यावर शेवटच्या दिवशी भाजपनं पहिले अडीच वर्षं तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशी नवी ऑफर दिली, पण ठाकरेंनी भाजपशी चर्चाच केली नाही, असा दावा देखील शिरसाट यांनी केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram