Sudhir Mungantiwar Meet Amit Shah :'अमित शहांनीच भेटायला बोलावलं होतं'; मुनगंटीवारांचा मोठा दावा

Continues below advertisement
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या दिल्लीतील भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 'अमित शहांनीच मला स्वतः भेटायला बोलावलेलं होतं,' अशी माहिती खुद्द सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपी माझाला दिली आहे. ही भेट तब्बल चाळीस मिनिटे चालली असून यामध्ये अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. या भेटीमुळे मुनगंटीवार यांना पक्षातर्फे लवकरच एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्ली दौऱ्यात मुनगंटीवार यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) आणि नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींचीही सदिच्छा भेट घेतली. मात्र, अमित शाह यांच्यासोबतच्या या महत्त्वपूर्ण भेटीमागील नेमकं कारण काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola