Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्या वन खात्यात पैसे घेऊन बदल्या?
Continues below advertisement
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या खात्यामध्ये पैशाच्या बदल्यात बदल्या करण्यात आल्या, अशी तक्रार भाजपच्याच चार आमदारांनी केली आहे. यानंतर मुनगंटीवार यांनी या बदल्यांना स्थगिती दिली आहे. वनमंत्री मुनगंटीवार परदेशात असताना 200 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, या सर्व बदल्या पैसे घेऊन केल्या, असा आरोप या चार आमदारांनी केला आहे. हरिभाऊ बागडे, राम सातपुते, रणधीर सावरकर, आशिष जयस्वाल या चार आमदारांनी वनमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या बदल्यांचे आदेश आणि आमदारांचा संपूर्ण पत्रव्य़वहार ही गोपनीय कागदपत्र एबीपी माझाकडे आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षकांची आज मंत्रालयात पेशी होणार आहे. आरएफओंच्या बदल्या करताना कुठले निकष वापरण्यात आले, कोणत्या चौकशीदरम्यान पाणी कुठे मुरले, नियमावलींचे पालन केले का, या सगळ्याचा शोध आता घेतला जाणार आहे.
Continues below advertisement