Sudhir Mungantiwar : मंत्रिपद नाही, प्रत्येक वाक्यात वेदना, हळहळून सुधीरभाऊ काय म्हणाले?

Continues below advertisement

Sudhir Mungantiwar : मंत्रिपद नाही, प्रत्येक वाक्यात वेदना, हळहळून सुधीरभाऊ काय म्हणाले?

हेही वाचा : 

रविंद्र चव्हाण हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, यंदा त्यांनी डोंबिवलीतून चौथ्यांदा विजय मिळवत विधानसभा गाठली आहे. तर, शिवसेनेतील बंडावेळीही त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली. तसेच, यापूर्वी दोनवेळेस त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती, शिवाय ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही जवळचे मानले जातात. त्यामुळे, त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, रविंद्र चव्हाण यांना भाजपकडून मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याजागी रविंद्र चव्हाण यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे, रविंद्र चव्हाण यांना पक्षात मोठं स्थान मिळत आहे, पण सुधीर मुनगंटीवार यांना संधी न देण्यामागे भाजपचं काय राजकारण आहे, याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुधीर मुनगंटीवार हे देखील भाजपचे वरिष्ठ नेते असून यापूर्वी त्यांनी पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाचा कामकाज सांभाळलेला आहे. त्यामुळे, भाजपने त्यांच्यासाठी काय योजना आखलीय हेही पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram