Sudhakar Kohale : रामटेकमध्ये भाजपमुळेच शिवसेनेच्या उमेदवाराला 5 लाख 33 हजार मतं मिळाली!
Sudhakar Kohale : रामटेकमध्ये भाजपमुळेच शिवसेनेच्या उमेदवाराला 5 लाख 33 हजार मतं मिळाली! रामटेक मध्ये भाजपमुळेच शिवसेनेच्या उमेदवाराला 5 लाख 33 हजार मते मिळाली.. ज्यांचा जिल्ह्यात एकही सरपंच नाही त्यांनी जरा आत्मचिंतन करावं की हे 5 लाख 33 हजार मतं कोणाच्या जोरावर मिळाले.. रामटेक मध्ये शिवसेनेचं बळ किती आणि भाजपचे बळ किती याचा ही शिवसेनेने आत्मचिंतन करावं... भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी रामटेक बद्दल शिवसेनेला खडे बोल सुनावले.. एवढेच नाही तर शिवसेनेचे कृपाल तुमाने दोन वेळेला भाजपच्या मतांच्या भरवशावरच खासदार झाले होते याची आठवण ही कोहळेंनी करून दिली. ( 2 दिवसांपूर्वी कृपाल तुमाने यांनी रामटेकमधील पराभवबद्दल बावनकुळे आणि भाजप वर गंभीर आरोप केले होते...) रामटेक ची जागा भाजपला द्यावी अशी आमची मागणी होती, मात्र वरिष्ठ पातळीवर तसा निर्णय झाला नाही... त्यानंतर भाजपसाठी एनडीएची एक-एक सीट महत्त्वाची आहे या दृष्टिकोनातून भाजप कार्यकर्त्यांनी रामटेकसाठी मेहनतही घेतली... भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे रामटेक मध्ये शिवसेनेचे उमेदवाराला 5 लाख 33 हजार मते मिळाली.. ज्यांचा जिल्ह्यात एकही सरपंच नाही, रामटेक मध्ये आपलं बळ किती आणि भाजपचे बळ किती आहे याचा शिवसेनेने आत्मचिंतन करावं... यापूर्वी दोन वेळेला कृपाल तुमाने रामटेकचे खासदार झाले... तेव्हाही शिवसेनेला मिळालेली मत भाजपचे भरवशावर होती हे विसरून चालणार नाही... आता वाद करण्यात अर्थ नाही महायुती म्हणून पुढेही आपल्याला सोबत जायचं आहे याची जाणीव शिवसेना नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ठेवावी...