Sudhakar Badgujar Full PC : व्हिडिओ मॉर्फिंग केलाय, Salim Kutta शी कोणतेही संबंध नाही

Continues below advertisement

नाशिक : नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया समोर आलीये. नितेश राणे यांनी योग्य माहिती न घेता आरोप केल्याचा दावा यावेळी बडगुजरांनी केलाय.  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी (Nitesh Rane) केला आहे. दरम्यान या आरोपांवर बोलताना सुधाकर बडगुजर म्हणाले की, ही जाणीवपूर्वक भेट झालेली नाही, कोणत्यातरी सार्वजनिक ठिकाणी आमची भेट झालेली असू शकते किंवा हा व्हिडिओ मॉर्फिंग देखील असू शकतो, आम्ही पोलिसांना सर्व प्रकराच्या चौकशीसाठी सहकार्य करु. सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Blast)  खटल्यातला प्रमुख आरोपी आहे, तो पॅरोलवर असताना बडगुजर यांनी ही पार्टी केली असा आरोप नितेश राणेंनी केलाय. या पार्टीचे फोटोच नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले आणि कारवाईची मागणी केली. यावर एसआयटी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असातनाचा फोटो  नितेश राणेंनी सभागृहात दाखवला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram