Hingoli Jaleshwar Pond : तलावासाठी कोट्यवधींचं कंत्राट, मात्र पिचिंगचं काम निकृष्ट दर्जाचं
Continues below advertisement
जिल्ह्यात जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. तलावाच्या सुशोभीकरणासाठी संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले असून पिचींगचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनेक ठिकाणी तलावाची पिचींग ढासळली आहे, तर काही ठिकाणी ही पिचिंग पूर्णतः उघडी पडली आहे. यामुळे तलाव फुटण्याचा धोका वाढला आहे. कंत्राटातील कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. तलावाच्या सुरक्षिततेबाबत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement