ABP News

Disha Salian च्या मृत्यूबाबत राणेंनी केलेल्या दाव्याचे अहवाल 48 तासात सादर करा: राज्य महिला आयोग

Continues below advertisement

Disha Salian Parents : केंद्रीय मंत्री नारायण राणे खोटं बोलले का? हा प्रश्न विचारण्यामागचं कारण आहे दिशा सालियनच्या आई-वडिलांच्या डोळ्यातले अश्रू. राजकीय स्वार्थासाठी आमच्या मुलीची नाहक बदनामी केली जातेय, दिशा सालियन हिची हत्या झालीच नव्हती. तिचा पोस्ट मार्टेम रिपोर्टही आलाय अशी माहिती आज दिशा सालियनच्या आई-वडिलांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. आणि आपली व्यथा मांडताना दिशाच्या माता-पित्याच्या डोळ्यात अश्रू उभे ठाकले होते. दिशा सालियनवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप नारायण राणेंनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram