Medical Education in Marathi : महाराष्ट्रात मिळणार मराठीतून वैद्यकीय शिक्षण,अभ्यासक्रमाची तयारी सुरु
Continues below advertisement
मध्य प्रदेशप्रमाणे आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 2023 च्या शैक्षणिक वर्षांपासून वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होतील.मराठीतून वैद्यकीय अभ्यासक्रम बनविण्याची तयारी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आली असून,त्यासाठी विविध तज्ज्ञांच्या समित्या स्थापन करण्यात आल्यात. विशेष म्हणजे मराठीतून वैद्यकीयचे शिक्षण घेणे बंधनकारक राहणार नाही, ते ऐच्छिक असेल. एमबीबीएससह आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
Continues below advertisement