Student Vaccination : बोर्ड परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांचा लसीकरण पूर्ण करा, शिक्षक-पालकांची मागणी
3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरवात होत आहे...यामध्ये दहावी बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी बोर्डाकडून केली जात असताना शिक्षक आणि पालकांनी सुद्धा बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या लसीकरण लवकरात लवकर व्हावे अशी मागणी केली आहे. शिवाय, राज्यात बोर्ड परीक्षेच्या कामात सहभागी होणाऱ्या दोन ते अडीच लाख शिक्षकांना प्राधान्याने बूस्टर डोस द्यावा, जेणेकरून बोर्ड परीक्षा सुद्धा सुरळीत पार पडतील असं सुद्धा शिक्षकांचे म्हणणे आहे. राज्यातील साधारणपणे 26 लाख विद्यार्थी हे दरवर्षी दहावी बारावी बोर्ड परीक्षा देतात त्यामुळे परीक्षा सुरू होण्यापूर्वी यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे, असं मत शिक्षकांनी मांडले आहे. विद्यार्थीसुद्धा लस घेण्यासाठी तयार असून 15 ते 18 वयातील विद्यार्थ्यांची माहिती शाळांकडून मुंबई महापालिकेने मागवली जात आहे. शाळेमध्ये लसीकरण सुरू केल्यास पालकांच्या संमतीने प्रशासनाच्या सहकार्याने शाळेत लस देण्यास सुद्धा शाळा तयार आहेत. दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत शिक्षक विद्यार्थी पालकांना नेमकं काय वाटतंय...जाणून घेतलाय.