Piyush Goyal : मुलाने केलेलं भाषण वादात, ठाकरे गटाच्या तक्रारीमुळे पियूष गोयल अडचणीत
उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे दिग्गज नेते पियूष गोयल रिंगणात उतरले आहेत. याच मतदारसंघातील एका कॉलेजमध्ये गोयल यांच्या मुलाने केलेलं भाषण वादात सापडलंय... या भाषणाला विद्यार्थ्यांना जबरदस्तीने बसवल्याचा आरोप खुद्द विद्यार्थ्यांनीच केलाय. तसा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आणि यावरूनच विरोधकांनी भाजपसह पियूष गोयल यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. पाहूयात, ठाकरे गटाच्या तक्रारीमुळे ठाकूर कॉलेज आणि पियूष गोयल कसे अडचणीत सापडलेत, या स्पेशल रिपोर्टमधून...