Pune : बैलगाडा शर्यत भरवणाऱ्यावर कारवाई होणार : गृहमंत्री Dilip Walse Patil : ABP Majha
Continues below advertisement
मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रशासनाचा विरोध झुगारत अखेर सांगलीतील झरे गावात बैलगाडा शर्यत भरवलीच. बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणावर पोलिसांनी चरे मारले होते. शिवाय त्याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. तरीही झरे-वाक्षेवाडीच्या हद्दीत असलेल्या एका डोंगरावर 7 बैलगाड्यांची शर्यती पार पडली. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांसोबतच शेतकरी नेते सदाभाऊ खोत उपस्थित होते. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील अनेक बैलगाडा शर्यत प्रेमींनीही येथे उपस्थिती लावली होती. यानंतर गृहमंत्री दिलीप पळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Continues below advertisement