महाराष्ट्रात झालेली दगडफेक, तोडफोड चिंतेचे प्रकार, राज्य सरकारनं त्वरित दखल घ्यावी : फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात आज झालेल्या हिंसाचाराबद्दल ट्वीटद्वारे भावना मांडल्या.. “त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!” असा उल्लेख त्यांनी ट्वीटमध्ये केला.