Solapur Sting Operation: आरटीआय कार्यकर्त्याकडून स्टिंग ऑपरेशन, पोलिसांकडून हफ्ते वसुली ABP Majha

सोलापुरात अवैध धंदेवाल्यांकडून पोलिसांची हप्ते वसुली सुरु असल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केलीय. या संदर्भात एक व्हिडीओदेखिल त्यांनी पाठवला आहे. त्यात पोलीस कर्मचारी पाडवी हे हप्त्याची मागणी करत असल्याचा दावा पवार यांनी केला आहे. वरपर्यंत पैसे द्यावे लागतात असा दावाही हा पोलीस कर्मचारी करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले होते. पण पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे गुन्हे शाखेत बदली झाल्यापासून वरिष्ठांच्या नावे हप्ता वसुली करत असल्याचा आरोप तक्रारदार योगेश पवार यांनी केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola