Maharashtra Corona : कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यू संख्येबाबत आकडेवारी लपवली जात नाही : राज्य सरकार
Continues below advertisement
Maharashtra Corona Cases : राज्यात हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र कालपासून डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असल्याचं दिसून येत आहे. आज मृत्यूच्या आकड्यातही कालच्या तुलनेत वाढ झाल्याचं दिसत आहे. राज्यात आज 11,766 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 8,104 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 406 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात काल 12 हजार 207 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती तर 11 हजार 449 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता तर काल आज 393 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती.
Continues below advertisement