Maharashtra Lockdown : राज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढण्याची शक्यता, कॅबिनेटमध्ये निर्णयाची शक्यता
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडणार आहे. आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण राज्यात लॉकडाऊन वाढणार की नाही वाढणार? लॉकडाऊन वाढला तर किती दिवस वाढणार? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मिळणार आहेत. सध्यातरी राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ बैठक इतर महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. यावर एक नजर टाकूया.
अनेक जिल्ह्यामध्ये कोरोनाची स्थिती सुधारत आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवलं तर ते सरसकट वाढवणार की मुंबई, पुणे अशा अनेक ठिकाणी कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे तिथे काही सूट नागरिकांना दिली जाऊ शकते का, हे मंत्रिमंडळ बैठकीनंतर कळेल.