5 सप्टेंबर पर्यत राज्यातील शिक्षकांचं प्राधान्यक्रमानं लसीकरण पूर्ण करण्याचे आरोग्य विभागाचे आदेश
Continues below advertisement
राज्यातील शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्यक्रमाने केले जाणार आहे. पाच सप्टेंबरपर्यंत सर्व शाळातील शिक्षकांचे लसीकरण करण्याबाबतचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने काढले आहेत. राज्यातील शिक्षकांचे प्राध्यानक्रमाने लसीकरण करण्याबाबत सर्व महापालिका, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्यात. त्यामुळे आता प्रत्येक गावात, शहरात आणि महापालिका हद्दीत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
Continues below advertisement