महामार्गांसाठी जमीन अधिग्रहित झाल्यास मिळणारा मोबदला घटवण्याचा निर्णय State Government घेतलाय

Continues below advertisement

महामार्गांसाठी जमीन अधिग्रहित झाल्यास मिळणारा मोबदला घटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. राज्य सरकारने या संदर्भातील जीआर जारी केलाय. आता भूखंडधारकांना राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गासाठी कृषी जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 20 टक्के आणि अकृषक जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 60 टक्के कमी मोबदला मिळेल. या निर्णयामुळे भूखंडधारकांमध्ये निराशा पसरलीय. यापूर्वी अकृषी जमीन महामार्गासाठी अधिग्रहित झाल्यास मोबदला गुणक 2  दिला जात होता. तो आता कमी करून1  करण्यात आला आहे. म्हणजेच मोबदला अर्धा होईल. इतकेच नव्हे, तर सर्व प्रकारच्या भूखंडांचा मोबदला निश्चित करताना रेडीरेकनरचे दरसुद्धा २० टक्के कमी करण्यात आलेेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram