Liquor Home Delivery | राज्यभरात 14 तारखेपासून घरपोच दारू मिळणार, दारुविक्रीसाठी काय आहेत सरकारच्या अटी-शर्थी?
Continues below advertisement
मद्यप्रेमींसाठी खुशखबर आहे. राज्यात यापुढे परवाना धारकास त्याच्या निवासी पत्त्यावर दारुची होम डिलिव्हरी मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी, संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.
अटी आणि नियमानुसार भारतीय बनावटीचे विदेशी मद्य स्पिरिटस, बिअर, सौम्य मद्य, वाईनची परवानाधारक मद्य विक्रेत्याला होम डिलिव्हरी करता येणार आहे. यासाठी ठराविक वेळ ठरवून दिली जाणार आहेत. त्या वेळेतच होम डिलिव्हरी करता येणार आहे. दारूच्या होम डिलिव्हरीसाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तीने मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सूचना उत्पादन शुल्क विभागाने दिल्या आहेत.
Continues below advertisement
Tags :
Liquor Home Delivery Wine Shop Permission Maharashtra Lockdown Wine Shop Lockdown 3 Coronavirus