Sameer Wankhede यांच्याविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल ABP Majha
एनसीबीच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.. खोटी माहिती देऊन दारु विक्रीचा परवाना मिळवल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा गुन्हा दाखल केला आहे... त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत... नवी मुंबईतील वाशीमध्ये समीर वानखेडेंच्या मालकीचं सद्गुरु बार आणि हॉटेल आहे... या बारचा परवाना काढताना वानखेडेंनी खोटी माहिती दिल्याची तक्रार राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती. या तक्रारीनंतर काही दिवसांपूर्वीच ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या बारचा परवाना रद्द केला होता.