Coronavirus | राज्यात मागील 24 तासात 3752 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, कुठे किती रुग्ण वाढले?
राज्यात गुरुवारी (18 जून) 3752 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे. राज्यात काल 1672 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 60 हजार 838 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 53 हजार 901 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.