Ajit Pawar : राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडीने दाखल केलं आरोपपत्र,अजित आणि सुनेत्रा पवारांचं नाव नाही
Continues below advertisement
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं एक आरोपपत्र दाखल केलंय.. अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांशी संबंधित कंपनीविरोधात हे आरोपपत्र आहे.. मात्र आरोपपत्रात अजित आणि सुनेत्रा पवारांचं नाव नाहीये.. याचा अर्थ अजित पवारांना ईडीकडून दिलासा मिळाला असं नाही. कारण काही दिवसांत ईडी पुरवणी आरोपपत्र दाखल करून त्यात अजित पवारांचं नाव असल्याची शक्यता आहे, असं ईडीमधील सूत्रांनी एबीपी माझाला दिली. 2021 मधे सक्तवसुली संचालनालयानं या घोटाळ्याप्रकरणी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या जवळपास 65 कोटींची मालमत्ता जप्त केली होती.
Continues below advertisement