Maratha Reservation : मागासवर्ग आयोगाच्या हरकती, सूचनांचा EXCLUSIVE अहवाल एबीपी माझाकडे

Continues below advertisement

Maratha Reservation : मागासवर्ग आयोगाच्या हरकती, सूचनांचा EXCLUSIVE अहवाल एबीपी माझाकडे 
राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर राज्यभरातून हरकती आणि सुचना मागविण्यात आल्या होत्या. या हरकती आणि सूचनांचा EXCLUSIVE अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय. या हरकती आणि सूचनांमधे 40 टक्के लोकांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याची शिफारस केलीय. तर 41 टक्के लोकांनी सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचा अभिप्राय दिलाय. ज्यांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा अभिप्राय दिलाय त्या 40 टक्क्यापैकी 31 टक्के लोकांनी मराठा समाज सामाजिक मागास असल्याचं म्हटलय.  तर 9 टक्के लोकांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असला तरी मराठा समाजाला ओबीसींमधे नाही तर स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस केलीय.  या अहवालानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश संदीप शुक्रे यांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असून आरक्षणास पात्र असल्याची शिफारस सरकारला केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram