नव्या कृषी कायद्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक, त्रुटी-उणिवांबाबत उपसमितीसोबत चर्चा करणार

Continues below advertisement

राजधानी दिल्लीच्या वेशीवर कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. अशातच राज्याचे शिक्षण राज्यमंत्री आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांनीसुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी बाईकवरुन दिल्ली गाठली आहे. त्यानंतर बच्चू कडू यांनी तिथल्या आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी आज मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक होणार आहे. आज दुपारी दोन वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये अधिनियमांतील त्रुटी आणि उणिवांचा अभ्यास करण्यात येणार आहे. 

मंत्रिमंडळ उपसमितीची दुपारी दोन वाजता मंत्रालयात बैठक पार पडणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांमधील त्रुटी आणि उणिवांबाबत मंत्रालयात आज खलबतं होणार आहेत. त्रुटी आणि उणिवांबाबत अभ्यास करणाऱ्या उपसमितीसोबत आज मंत्रालयात खलबंत होणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram