OBC Reservation :येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत OBC आरक्षण राज्य मागासवर्ग आयोग ठरवणार

Continues below advertisement

OBC Political Reservation Latest Updates :  ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) सुप्रीम कोर्टात महत्त्वाची घडामोड घडली आहे. मार्चमध्ये होणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणासह होणार की नाही याचा निर्णय आता राज्याने नेमलेले राज्य मागासवर्ग आयोग घेणार आहे. महाराष्ट्र सरकारकडे उपलब्ध असलेला डेटा त्यांनी आयोगाला द्यावा त्यानंतर आयोग दोन आठवड्यात त्या डेटावर आरक्षण तात्पुरते  देता येईल की नाही हे कळवणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही हे आयोगाच्या निर्णयावर आणि दोन आठवड्यात ठरणार आहे.  ही तात्पुरती सोय केवळ आत्ताच्या निवडणुकांपुरती आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram