ST Workers Strike Ganesh Chaturthi : ऐन गणपतीत एसटी कामगारांचा संप? नेमकं प्रकरण काय? ABP Majha
ST कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा आक्रमक झाले असून ऐन गणपतीच्या तोंडावर त्यांनी बेमुदत संपाची हाक दिलीय. एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित आर्थिक मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी 11 सप्टेंबरला ही संपाची हाक दिलीय. हे कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण करतील. आणि जर सरकारने ऐकले नाही तर १३ सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक आगारात कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीतहा निर्णय घेण्यात आलाय.