ST Protest : उस्मानाबाद मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं, एका कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा इशारा
Continues below advertisement
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळताना दिसतंय. तिथे एक एसटी कर्मचारी फास गळ्यात अडकवून पहाटेपासून झाडावर आहे. आगारासोमोर नातेवाईकांसह इतर कर्मचारी टाहो फोडत आहेत. पोलिसांनी विनंती करुनही एसटी कर्मचारी खाली उतरण्यास तयार नाही. एसटी आगारातून बाहेर काढल्यास आत्महत्या करेन, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यानं दिला आहे.
Continues below advertisement