ST Strike : राज्यभरात संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई, 376 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन
राज्यभरात संपावर गेलेल्या 376 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे. त्यात सांगली आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी 58 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं आहे. नागपूरच्या गणेशपेठ आगारातील 18 कर्मचाऱ्यांना एसटीच्या विभागीय नियंत्रकांनी निलंबित केलं आहे. या सर्व 18 कर्मचाऱ्यांनी 31 ऑक्टोबर रोजी गणेशपेठ बस स्थानकावर काही राजकीय कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केलं होतं. तसंच एसटीच्या चाकांची हवा काढून गोंधळ निर्माण केला होता. त्याच 18 कर्मचाऱ्यांना आज निलंबित करण्यात आलं आहे.