ST Workers Strike : एसटी संपावर तोडगी कधी? जनता वेठीस ABP Majha

सलग तिसऱ्या दिवशी संप कायम ठेवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता प्रशासनानं कारवाईचा बडगा उचललाय..कालपर्यंत राज्यभरातल्या ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. मात्र प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता संप कायम ठेवणार असल्याचा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलाय. आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबई सेेंट्रल ते मंत्रालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे.. दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे.. तसंच दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील एसटी संपावर खलबतं होणार असल्याचं कळतंय. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola