ST Worker Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला महिना पूर्ण, बहुतांश कामगार अजूनही संपावर ABP Majha

Continues below advertisement

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला महिना पूर्ण झालाय तरीही बहुतांशी कामगार अजूनही संपावरच आहेत. १०५ पेक्षा अधिक आगारात एसटी सुरु झाली असली तरी पूर्ण क्षमतेनं वाहतूक सुरू झालेली नाही. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं म्हणून कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत सुरु केलेल्या संपानंतर राज्यभरातली एसटी सेवा ठप्प झाली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतल्या आझाद मैदानात कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. या काळात सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना आजवरची मोठी पगारवाढ जाहीर करूनही कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. यासाठी न्यायालयानं नेमलेल्या समितीचा अहवाल प्रतीक्षेत आहे. विशेष म्हणजे मान्यताप्राप्त संघटनांचं नेतृत्व झुगारून हा संप सुरू झाला आणि सरकारनं वारंवार आवाहन करूनही तो सुरूच आहे. त्यामुळे संपावर तोडगा कसा निघणार हा प्रश्न महिनाभरानंतरही कायम आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram