ST Workers Strike : एसटी महामंडळाचं कर्मचाऱ्यांना 24 तासांचं 'अल्टिमेटम'; कामावर हजर व्हा अन्यथा...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ सरसावलंय. रोजंदारीवर काम करणाऱ्या तीनशे ते साडेतीनशे कामगारांना एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावलीय. या कामगारांनी २४ तासांत कामावर हजर व्हावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल असं या नोटीशीत म्हटलंय. एसटी महामंडळाने आतापर्यंत २ हजार १७८ कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय.. दरम्यान काल एसटी महामंडळाचे सुमारे साडेसात हजार कर्मचारी कामावर हजर झाले. काल संध्याकाळी सहापर्यंत ६६ बसेस राज्याच्या विविध भागात सोडण्यात आल्या असून जवळपास दोन हजार प्रवाशांनी प्रवास केला.