ST Workers Strike : सांगलीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला, सकाळपासून लांबपल्ल्याच्या 10 गाड्या रद्द
कुलदीप माने, एबीपी माझा
Updated at:
08 Nov 2021 09:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. राज्यातील 250 पैकी 160 आगार सध्या बंद आहेत. आज आणखी बस डेपोतील कर्मचारीही या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी संप चिघळण्याची शक्यता आहे.
सांगलीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. सांगली बस स्थानकात पहाटेपासून पुन्हा संप सुरू करण्यात आलाय. सकाळपासून लांबपल्ल्याच्या १० गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत.