ST Workers Strike : बुलढाण्यात एसटी वाहतूक ठप्प; जिल्ह्यातील अडीच हजार कर्मटचारी संपावर ABP Majha
जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. राज्यातील 250 पैकी 160 आगार सध्या बंद आहेत. आज आणखी बस डेपोतील कर्मचारीही या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी संप चिघळण्याची शक्यता आहे.
बुलढाणा जिल्ह्यातले अडीच हजार एसटी कामगार संपावर गेले आहेत. त्यामुळे एसटी सेवा ठप्प झाली असून प्रवाशांचे हाल झालेत. काल दिवसभरात जिल्ह्यातल्या आगारांतून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे या संपानं बुलढाणा विभागाचं ३० ते ३५ लाख रुपयांचं नुकसान झालं. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खाजगी वाहतुकदारांनी अवास्तव भाडं आकारून वाहतूक सुरू केलीय. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
Tags :
Mumbai Bombay High Court Msrtc High Court ST Strike State Transport Buldhana St Workers Maharashtra ST Employee Protest ST Employee Protest Buldhana St Workers Strike