ST Workers Strike : राज्यातील एसटी कर्मचारी संप चिघळण्याची शक्यता ABP Majha

 जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. राज्यातील २५० पैकी १६० आगार सध्या बंद आहेत. आज आणखी बस डेपोतील कर्मचारीही संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी संप चिघळण्याची शक्यता आहे. तिकडे मुंबईतही १७ एसटी कर्मचारी संघटनांची महत्वाची बैठक होतेय. याशिवाय एसटीचा प्रश्न आता न्यायालय दरबारी गेलाय. त्यामुळे उच्च न्यायालयातही याबाबत सुनावणी होणार आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola