ST Workers Strike : कामावर रुजू झाल्यास निलंबन मागे घेतलं जाईल : Anil Parab
Continues below advertisement
गेल्या १७ दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ब्रेक लावण्यासाठी, परिवहन विभागानं आतापर्यंतची सर्वात मोठी पगारवाढ जाहीर केली. मात्र एसटी महामंडळाचे कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर अजूनही ठाम आहेत. त्यामुळं पगारवाढीच्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संप मिटणार की सुरुच राहणार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. काल सह्याद्री अतिथिगृहावर परिवहन मंत्री अनिल परब, संपकऱ्यांचं नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत ही नेते मंडळी आणि कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ यांच्यात बैठक पार पडली...कर्मचारी कामावर हजर राहिल्यास निलंबन रद्द करण्याची घोषणाही अनिल परब यांनी केली. दरम्यान आज कर्मचाऱ्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करू असं गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलंय.
Continues below advertisement