ST Workers : सिंधुदुर्गात आज पहिली एसटी धावली, उस्मानाबादही हळूहळू पूर्वपदावर
एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण करावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अजूनही कायम आहे. काही कर्मचाऱी मागण्यांवर अजूनही ठाम आहेत. मात्र काही कर्मचारी बडतर्फीची कारवाई टाळण्यासाठी कामावर रुजू झाले आहेत. परिणामी राज्यात काही ठिकाणी एसटी ची वाहतूक अंशतः सुरू झालेय. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली सावंतवाडी मार्गावर पहिली एसटी रवाना झाली .