ST Strike : मुंबईत एसटी महिला कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, तोडगा निघत नसल्यानं टोकाचं पाऊल
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अजूनही तोडगा निघत नाही त्यामुळे आज तीन ते चार महिला एस टी कर्मचाऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस कर्मचाऱ्यांनी या आंदोलक महिलांना रोखलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या आंदोलकांची एसटी महामंडळाचे राज्य सरकतमध्ये विलिनीकरण करा अशी मागणी आहे.