कृती समिती शासनासोबत डील करत असल्याचा दावा, Solapur Dhule Kolhapur मध्ये ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन
एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलनाची धग पुन्हा वाढली आहे. कृती समितीने घेतलेली भूमिका मान्य नाही, असं म्हणत सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं. या आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच राष्ट्रवादी भाजपसोबत सलगी करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगितलं.
राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सांगलीमध्ये भाजपमध्ये सलगी करत आहेत, या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही. सकाळी एक राजकारण, दुपारी एक राजकारण आणि संध्याकाळी एक राजकारण. एकवेळ काँग्रेस परडवली. काँग्रेसमधील सर्व व्यक्तीमत्व वेल कल्चर असतात. दरोडेखोर नसतात. राष्ट्रवादीनं सलगी करणं याला राष्ट्रवादी कधीचं भूलणार नाही. राष्ट्रवादी भाजपसोबत करत असलेल्या डावाला भाजप फसणार नाही.'