ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे; मंत्रालयातल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय ABP Majha
गेले अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचार्यांच्या काही मागण्या अखेरीस सरकारनं मानल्या आहेत. आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलंय. एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १२ वरून २८ टक्क्यांवर वाढवण्यात आलाय तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ केलेली आहे. आज मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनांची मंत्रालयात बैठक झाली त्यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तर उर्वरीत मागण्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं मंत्री अनिल परब यांनी सांगितलंय