ST Worker Strike: संपकारी एसटी कर्मचाऱ्यांवर 'मेस्मा' अंतर्गत कारवाई होणार? ABP Majha
महिना उलटून गेल्यानंतर देखील एसटी कर्मचारी आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. अजूनही अनेक डेपोमध्ये एसटी कर्मचारी कामावर जात नसल्यामुळे अखेर मेस्मा सारखं हत्यार राज्य सरकार उगारणार असल्याची चर्चा आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीतही देखील चर्चा झालीये. त्यामुळे आज खरंच मेस्मा लागू होतोय का याकडे एसटी कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं आहे.