ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला, प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलंय. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्यासाठी सरकारनं त्रिसदस्यीय समितीही स्थापन केलीय. न्यायालयात याबाबत सरकारनं माहिती दिल्यानंतरही एसटी कर्मचारी संपावर ठाम राहिल्यानं एसटीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघत नसल्याने धोकादायक प्रवासी वाहतूक सुरु झाली आहे. टेम्पो, पिकअप व्हॅन, मालवाहतूक करणाऱ्या गाड्या अशा मिळेल त्या वाहनाने नागरिक घरी परततायत.