ST Shivai Bus : 'लालपरी'चं अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण, 'शिवाई' इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण

Continues below advertisement

महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या 'लालपरी'नं आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केलंय.. आणि याच दिवसाचं औचित्य साधून एसटी महामंडळाच्या ताफ्यात पहिली 'शिवाई' इलेक्ट्रिक बस दाखल झालीय. या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालाय.. पुण्यातील शंकरशेठ रस्त्यावरील एसटीच्या विभागीय कार्यालयात एक वडाचं झाड आहे. एक जून 1948 रोजी याच वडाच्या झाडाखालून एसटीची पहिली बस पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली होती. दरम्यान अहमदनगरमध्येही शिवाई बसला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि महापौर राहिणी शेंडगे यांनीही हिरवा झेंडा दाखवला.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram